Maval Corona Update : तालुक्यात दिवसभरात 182  नवे रुग्ण तर 68 जणांना डिस्चार्ज 

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात रविवारी (दि. 02) 182 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर तालुक्यात दिवसभरात 68 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

आज ग्रामीण भागात रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. रुग्ण संख्येच्या तुलनेत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. आज एकही रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला नसुन आतापर्यंत 316 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला. सद्यस्थितीत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 1587 आहे.

शहरी भागात 81 तर ग्रामीण भागात 101 रुग्ण आज सापडले.आज तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत 11 रुग्ण सापडले. लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीत 64 रुग्ण सापडला. वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत 6 रुग्ण सापडले.

तालुक्यातील कोरोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या 13397 झाली आहे. तर दिवसभरात 68 रुग्ण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.

रविवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये ग्रामीण भागात कामशेत 23, तळेगाव दाभाडे ग्रामीण 23, शेवती 8, वराळे 7, आंबळे 6, टाकवे खुर्द 5, सोमाटणे 4, शिरगाव 3, इंदोरी 2, काले 2, नाणे 2, बेबड ओहळ, बुधवडी, कान्हे, माळवाडी, मोहितेवाडी, नायगाव, नवलाख उंब्रे, पिंपळखुटे, साते, शिलाटणे व सुदुंबरे प्रत्येकी1 एकूण 101 रुग्ण सापडले.

11494 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 316 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 4141, लोणावळा नगरपरिषद हद्दीत 2698 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 802 रुग्ण सापडले आहेत. शहरी भागात 7641 रुग्ण तर ग्रामीण भागात 5756 रुग्ण आढळून आले आहेत. 7 रुग्णांची परिस्थिती गंभीर आहे.

कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 85.08 टक्के आहे तर मृत्यू दर 2.36 टक्के आहे. सद्यस्थिती तळेगाव दाभाडे नगरपरिषद मध्ये 410, लोणावळा नगरपरिषद मध्ये 384, वडगाव नगरपंचायतमध्ये 57 व ग्रामीण भागात 736 असे एकूण 1587 रुग्ण आहेत, अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.