Maval Corona Update : मावळ तालुक्यात आज कोरोनाचे 60 नवीन रुग्ण; 125 जणांना डिस्चार्ज

आज आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये 33 रुग्ण शहरी भागातील आहेत. तर 27 रुग्ण ग्रामीण भागातील आहेत.

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात आज (गुरूवारी, दि. 3) कोरोनाचे 60 नवीन रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे कोरोनाबधितांची एकूण संख्या 2 हजार 151 झाली आहे. तर दिवसभरात 125 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आज आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये 33 रुग्ण शहरी भागातील आहेत. तर 27 रुग्ण ग्रामीण भागातील आहेत.

ग्रामीण भागात आढळलेल्या रुग्णांमध्ये कामशेत 12, काले 4, माळवाडी, वराळे येथील प्रत्येकी दोन, कुसगाव बु, धामणे, इंदोरी, सुदुंबरे, सुदवडी, नाणे, येळसे येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे.

तळेगाव शहरात 18, लोणावळा शहरात 10 आणि वडगावमध्ये 5 रुग्ण आढळले आहेत.

एकूण 2 हजार 151 रुग्णांमध्ये सध्या 508 रुग्ण सक्रीय आहेत. तर 1 हजार 560 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 83 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तळेगाव नगरपरिषद क्षेत्रात 744, लोणावळा नगरपरिषद 268 आणि वडगाव नगरपंचायत क्षेत्रात 145 रुग्ण सापडले आहेत. तर ग्रामीण भागात 994 रुग्ण आढळून आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.