Maval Corona Update : सोमवारी 66 नवे रुग्ण; एकाही रुग्णाचा मृत्यू नाही

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात सोमवारी (दि.22) 66 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर दिवसभरात 24 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकाही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नाही. ग्रामीण भागात रुग्ण संख्या कमी झाली आहे सक्रिय रुग्णांची संख्या 517 आहे.

सोमवारी तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीत 29 रुग्ण, लोणावळा नगरपरिषद हद्दीत 19 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 03 रुग्ण सापडले.

मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी नागरिकांना गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळा, नियमित मास्क वापरा, सॅनिटायझर वापरा व सामाजिक अंतर ठेवण्याचे आवाहन केले.

सध्या रुग्णालयात 517 रुग्ण उपचार घेत आहेत. तालुक्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 9075 झाली आहे. तर दिवसभरात 24 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

सोमवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये शहरी भागात 51 रुग्ण सापडले. ग्रामीण भागात तळेगाव दाभाडे ग्रामीण 05, इंदोरी 4, नवलाख उंब्रे 2, सुदुंबरे, कान्हे, वराळे व मुंढावरे प्रत्येकी 01 रुग्ण असे एकूण 15 रुग्ण सापडले.

8327 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. मावळ तालुक्यात आज एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. आतापर्यंत 232 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 2859, लोणावळा नगरपरिषद हद्दीत 1733 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 597 रुग्ण सापडले आहेत.

शहरी भागात 5189 रुग्ण तर ग्रामीण भागात 3886 रुग्ण आढळून आले आहेत. एकाही रुग्णांची परिस्थिती गंभीर नाही अशी माहिती मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.