Maval Corona Update : आज मावळमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 50 पेक्षाही कमी

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील रुग्णसंख्या घटू लागली असून रुग्ण बरे होण्याची संख्या वाढली. मावळ तालुक्यात शुक्रवारी (दि.28) 43 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर तालुक्यात दिवसभरात 118 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

आज ग्रामीण भागात रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. आज एक रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला असुन, आतापर्यंत 438 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 1832 आहे.

शहरी भागात 17 तर ग्रामीण भागात 26 रुग्ण आज सापडले. आज तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत एकही रुग्ण सापडला नाही. लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीत 15 रुग्ण सापडले. वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत 2 रुग्ण सापडले.

तालुक्यातील कोरोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या 21756 झाली आहे. तर दिवसभरात 118 रुग्ण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले. शुक्रवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये ग्रामीण भागात कामशेत 7, देवघर 4, कान्हे 4, बेबडओहळ 3, कुसगाव खुर्द 2 मळवंडी ठुले 2, वारू, चांदखेड, चिखलसे व बुधवडी प्रत्येकी 1 असे एकूण 26 रुग्ण सापडले.

19487 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 438 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 7079, लोणावळा नगरपरिषद हद्दीत 3794 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 1122 रुग्ण सापडले आहेत. शहरी भागात 11995 रुग्ण तर ग्रामीण भागात 9761 रुग्ण आढळून आले आहेत.

2 रुग्णांची परिस्थिती गंभीर आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 89.57 टक्के आहे तर मृत्यू दर 2.01 टक्के आहे. सद्यस्थिती तळेगाव दाभाडे नगरपरिषद मध्ये 789 लोणावळा नगरपरिषद मध्ये 175 वडगाव नगरपंचायत मध्ये 73 व ग्रामीण भागात 795 असे एकूण 1832 रुग्ण आहेत. अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.