सोमवार, डिसेंबर 5, 2022

Maval crime : पोलीस असल्याची बतावणी करत तरुणाला लुटले

एमपीसी न्यूज –  मावळ (Maval Crime) रिसरात पोलीस असल्याची बतावणी करुण लुटमार करण्याचे प्रमाण वाढले आहे. दुचाकीवरून येऊन पोलीस असल्याचे सांगत नागरिकांना लुटत आहेत. मावळातील परंदवाडी येथे गुरुवारी (दि.4) एका तरुणाला पोलीस असल्याचे सांगत दोघांनी लुटले आहे.

उज्वल कालीपादा रॉय (वय.23 रा.उर्से, मावळ) यांनी परंदवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून दोन अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Bhosri : चोरांनी तरुणाला मारहाण करत मोबाईल चोरला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पायी चालत जात असताना दोन इसम दुचाकीवरून आले व त्यांनी फिर्यादीला दमदाटी करण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांनी फिर्यादीला तू तुझ्य़ा फोनमध्ये मुलींचे फोटो काढले असून ते आम्हाला माहिती झाले आहे. तू पोलीस ठाण्यात साहेबांकडे चल म्हणत फिर्यादीचा फोन हिसकावला व दोघे दुचाकीवरून फरार झाले. यामध्ये फिर्यादीचा 18 हजार रुपयांचा फोन चोरीला गेला आहे. परंदवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मावळातील ही दुसरी घटना असून या आधीही खालुंब्रे परिसरात पोलीस असल्याची बतावणी करुन वयस्क व्यवसायिकाला दोघांनी लुटले होते.

 

Latest news
Related news