Maval : एकविरा देवी मंदिर परिसराचा लवकरच कायापालट होणार – डॉ. नीलम गोऱ्हे

एमपीसी न्यूज – शिवसेनेच्या नेत्या तथा विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी (Maval) नवरात्रीच्या अष्टमीचे औचित्य साधत कार्ला येथील श्री एकविरा देवीचे दर्शन घेतले. डॉ. गोऱ्हे यांनी देवीची धार्मिक पूजा विधी करत आरती केली व देवीला साडीचोळी अर्पण केली. त्यावेळी त्यांनी एकविरा मंदिर परिसराचा लवकरच कायापालट होणार असल्याचे म्हटले.

याप्रसंगी उपजिल्हा प्रमुख दत्ता केदारी, शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजेश वाबळे, (Maval)युवासेना शहर प्रमुख माऊली जगताप, महिला जिल्हा प्रमुख शैला पाचपुते, महिला शहर प्रमुख शैला पाटील, उपशहर महिला संघटिका सुनीता चंदने, विशाल हुलावळे, मुन्ना मोरे आदी उपस्थित होते.

Pimpri : जमीन विक्रीच्या बहाण्याने साडेचार लाखांची फसवणूक

श्री एकविरा आईने, कर्तव्य पूर्ण करण्यासाठी शक्ती, उत्तम आरोग्य, सौख्य आणि यश द्यावं आणि इथे आलेल्या महिलांची स्वप्न पूर्ण व्हावीत, सर्व बांधवांच्या जीवनात यश मिळावं अशी देवी चरणी प्रार्थना डॉ. गोऱ्हे यांनी केली.

नवरात्रीच्या पहिल्या माळे दिवशीच पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्यासोबत बैठक घेतली आहे. यामध्ये एकविरा देवी मंदिराच्या पायऱ्यांची दुरुस्ती, रोप वे, भक्त निवास यांसह इतर पायासुविधांना अधिक गतीने चालना देण्यासाठी सरकारने एमएसआरडीसीकडे जबाबदारी सोपवली आहे.

यामुळे या परिसरात विकासात्मक कार्यामधून येथील चित्र बदललेले दिसेल. तसेच केंद्रीय पुरातत्व विभागाने परवानगी दिलेली आहे. वन विभागाच्या जागे संदर्भात लवकरच वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सोबत बैठक घेणार असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.