Maval : तालुक्यातील दुर्घटनाग्रतांच्या कुटुंबीयांना शासनाकडून चार लाखांची मदत देणार – बाळा भेगडे

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे ज्या व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले त्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना राज्य शासनाच्या वतीने प्रत्येकी ४ लाख रुपयांची मदत करण्यात येईल, अशी घोषणा महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन राज्यमंत्री संजय बाळा भेगडे यांनी करून सर्व कुटुंबियांची भेट घेणार असल्याचे सांगितले आहे.

यामध्ये लोणावळा हनुमान टेकडी येथे शेजारील घरावर भिंत कोसळून मृत्यू झालेल्या कुणाल अजय दोडगे, टाकवे दुर्घटनेतील संकेत नंदू असवले, अक्षय मनोहर जगताप आणि कामशेत नाणे येथील राहुल प्रकाश आंद्रे यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी जाहीर केली आहे

  • यावेळी लोणावळा नगराध्यक्ष सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, लोणावळा मुख्याधिकारी सचिन पवार, पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील, नगरसेवक देविदास कडू, बिंद्राताई गणात्रा,बाळासाहेब जाधव, मंदाताई सोनवणे, कल्पना आखाडे, माणिक मराठे,निखिल कविश्वेर,सुनील गायकवाड, संतोष कुंभार,हर्षल होगले व नागरिक उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.