Maval : कामशेत येथे शनिवार पासून कीर्तन महोत्सव

एमपीसी न्युज – श्री विठ्ठल परिवार मावळ व आमदार सुनिल शेळके यांच्या वतीने कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.(Maval) नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी, या उक्तीप्रमाणे ज्ञानदीपाचा उजेड मावळ वासियांना देण्यासाठी हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. 

कामशेत येथे शनिवार (दि.31 डिसेंबर) पासून कीर्तन महोत्सव सुरू होणार असल्याची माहिती कीर्तन महोत्सव समिती अध्यक्ष हभप दिलीप महाराज खेंगरे, श्री विठ्ठल परिवार अध्यक्ष हभप गणेश महाराज जांभळे, विठ्ठल नाम जप समिती प्रमुख हभप नितीन महाराज काकडे आदींनी दिली.

कामशेत येथे साजरा होणाऱ्या कीर्तन महोत्सवाचे पाचवे वर्ष असून दोन वर्षानंतर भव्य स्वरुपात कीर्तन महोत्सव साजरा होणार आहे.महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकारांची दररोज सायंकाळी साडेसहा वाजता सुश्राव्य कीर्तने होणार आहेत.

Today’s Horoscope 30 December 2022 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

मावळातील कानाकोपऱ्यातून विशेषतः ग्रामीण भागातून भाविक मोठ्या संख्येने येथे उपस्थित राहतात.या कार्यक्रमासाठी कामशेत येथील मैदानात मंडप उभारण्यात आला आहे.

शनिवार दि 31 डिसेंबर रोजी सोपान महाराज सानप, रविवार दि 1 जानेवारीला जयवंत बोधले, सोमवार 2 जानेवारीला माऊली महाराज कदम, मंगळवार दि 3 जानेवारीला पुरुषोत्तम महाराज पाटील तर बुधवार दि 4 जानेवारीला समाधान महाराज शर्मा यांचे कार्यक्रमाच्या अखेरच्या दिवशी सकाळी 10 ते 12 काल्याचे कीर्तन होणार आहे. भाविकांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन कीर्तन श्रवणाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.