Maval : कान्हे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी किशोर सातकर

एमपीसी न्यूज – कान्हे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या (Maval)चेअरमन पदी मावळ राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष किशोर पंढरीनाथ सातकर, व्हाइस चेअरमन पदी मोहितेवाडीचे माजी उपसरपंच अनिल मोहिते यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
वडगाव येथील सहकारी निबंधक कार्यालयात झालेल्या सभेत ही निवड जाहीर करण्यात आली.
या वेळी निवडणुक अधिकारी एम. ए कुलकर्णी, सचिव गणपत भानुसघरे, (Maval)संचालक दशरथ सातकर, बंडोबा सातकर, अशोक सातकर, प्रदिप ओव्हाळ,विलास जांभूळकर,एकनाथ येवले,दत्तात्रय शिंदे,सुदाम आगळमे, मंदा गाडे,नंदाताई सातकर,देवराम सातकर,विठ्ठल मोहिते,सचिव रमेश गाडे उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांकडून नवनिर्वाचित चेअरमन सातकर व व्हाईस चेअरमन मोहिते यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
कान्हे सोसायटीचे कार्यक्षेत्र कान्हे,साते,मोहितेवाडी, ब्राम्हणवाडी आणि जांभूळ या गावांचे असून सर्व शेतकरी बांधवांना शेती कर्ज,खत,शेती अवजारे व पुरक व्यवसाय करण्यास सहाय्य करणार असे नवनिर्वाचित चेअरमन सातकर यांनी सांगितले.
सातकर यांचे एम एस्सी ॲग्री शिक्षण झाले आहे. त्यांच्या या शिक्षणाचा सोसायटीच्या कामकाजात आणि पर्यायाने शेतकऱ्यांच्या हितासाठी चांगला फायदा होणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.