PMPML : शिवसेना, रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनच्या आंदोलनाची पीएमपीएमएल प्रशासनाने घेतली दखल

एमपीसी न्यूज – शिवसेना(एकनाथ शिंदे गट) आणि रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनच्या आंदोलनाची दखल (PMPML) पीएमपीएमएल प्रशासनाने घेतल्याची माहिती पुणे शहर शिवसेना प्रमुख प्रमोद नाना भानगिरे, महाराष्ट्र प्रदेश सचिव रिपब्लिकन एम्प्लॉइज फेडरेशनचे ॲड. मंदार जोशी यांनी दिली. 

पीएमपीएमएलचे अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक संजय कोलते यांच्या समावेत दि. 20 फेब्रुवारी रोजी पुन्हा सविस्तर बैठक पार पडली. त्यानंतर अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालकांनी आश्वासन दिले. सर्व बाबी तपासून सविस्तर मार्ग काढण्यात यईल, असेही त्यांनी सांगितले.

Maval : कान्हे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी किशोर सातकर

पीएमपीएमएल प्रशासनाच्या वतीने आंदोलन न करण्याची विनंती करण्यात आली. कर्मचाऱ्यांना कायम करण्याबाबत मागण्या मान्य न केल्यास पुन्हा रिपब्लिक एम्प्लॉईज  फेडरेशन कामगारांसाठी रस्त्यावर उतरेल, असा इशारा देण्यात आला. याबाबतची माहिती पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांना देण्यात आली. यावेळी सुधीर जोशी, अध्यक्ष रिपब्लिकन एम्प्लॉइज फेडरेशन पीएमपीएमएल युनिटचे नागेश गायकवाड, कार्याध्यक्ष रिपब्लिकन (PMPML) एम्प्लॉइज फेडरेशन पीएमपीएमएल युनिटचे गणेश कदम उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.