Maval : अजित पवार यांच्या वरील टीकेनंतर आमदार शेळके व मदन बाफना यांच्यात वार-पलटवार

एमपीसी न्यूज – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर (Maval) माजी राज्यमंत्री मदन बाफना यांनी टीका केल्यानंतर मावळातील वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी बाफना यांना हिशेब काढण्याचा दिलेला इशारा आणि त्याला मदन बाफना यांनी दिलेले प्रत्युत्तर यामुळे तालुक्यातील राजकीय कलगी-तुरा चांगलाच रंगला आहे.

सुनील शेळके म्हणाले की, बाफना साहेबांना मला विनंती करायची आहे. बाफना साहेब तुम्हाला सुद्धा मावळच्या जनतेने डोक्यावर घेतले होते. तुम्ही कुठल्या जाती-धर्माचे आहात, हे कधीही जनतेने पाहिले नाही. पण तुमचा काळ वेगळा होता. आमचा काळ वेगळा आहे. तुमची पिढी आणि आमची पिढी यात फरक आहे. बाफना साहेब तुम्ही वडिलकीच्या नात्याने आम्हाला आशीर्वाद द्या. आशीर्वादाच्या भूमिकेत रहा. तुम्हाला आमची भूमिका पटली नसेल तर तुम्ही तुमची भूमिका घ्या. पण तुम्ही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाबद्दल कुठेही चुकीचे वक्तव्य करू नका.

Pune : भजनसम्राट अनुप जलोटा यांच्या भजनांनी जिंकली रसिकांची मने

आमच्या नेत्याचा अपमान जर तुम्ही केला तर तुम्हाला जशास तसे उत्तर मी देणार. आपण माझ्या नेत्याबद्दल अपशब्द काढू नका. मागच्या दोन महिन्यांपूर्वी सुनील शेळके खूप चांगला आमदार आहे, खूप चांगली कामे करतो, असे म्हणणारे बाफना साहेब अचानक का बदलले, मला माहिती नाही. त्यामुळे तुम्ही जर आमच्या नेत्याबद्दल शब्द काढले तर आम्ही तुमचा हिशेब काढू, असा इशारा देखील सुनील (Maval) शेळके यांनी दिला.

मदन बाफना म्हणाले, आता सगळ्यांनी सगळेच संस्कार सोडले. असे संस्कार सोडलेल्या लोकांना मी बोलून दाखवणार. आमदारच काय पण अजित दादांच्या आणि साहेबांच्याही तोंडावर मी बोलतो. तुमचं हे चुकलं आहे, असं बोलण्याची हिम्मत फक्त मदन बाफनामध्ये आहे. विश्वनाथ तात्यांच्या विरोधात मी दोन वेळा लढलो. पण त्यावेळी विश्वनाथ तात्या माझ्या घरी चहा प्यायला यायचे. आतासारखे राजकारण त्यावेळी नव्हते. आता निवडणूक आहे का, तरीही बाफनाच्या विरोधात बोलणे ही काही पद्धत नाही.

आमदारांनी दम दिल्यामुळे आज घाबरत घाबरतच तळेगावात आलो, अशी मिश्किल टिप्पणीही बाफना यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.