Maval MNS : मावळात मनसेचे इंजिन रुळावर

एमपीसी न्यूज : मावळ तालुक्यात (Maval MNS) मनसेची नवीन कार्यकारिणी लवकरच जाहीर होण्याचे संकेत आहेत. वडगाव मावळ येथे नुकतीच मावळ तालुका पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक पार पडली. बैठकीत तालुका कार्यकारणी पुनर्बांधणी व पक्ष विस्तार यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यामुळे मावळात मनसे लवकरच कात टाकेल. पदाधिकाऱ्यांच्या निवडीच्या चर्चेमुळे मावळ मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना मावळ तालुका पदाधिकारी व कार्यकर्त्यांची काल वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत विशाल लॉन्स येथे महत्त्वाची आढावा बैठक पार पडली. तसेच तालुका कार्यकारिणीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांची माहिती घेऊन उपस्थित कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना प्रमुख नेत्यांकडून मार्गदर्शन करण्यात आले.

Dr. Amol Kolhe : शेतकऱ्यांना भूमिहीन करुन औद्योगिक द्रूतगती मार्ग करण्यापेक्षा ‘कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लानचा विचार व्हावा

या बैठकी दरम्यान प्रमुख मार्गदर्शक (Maval MNS) म्हणून ॲड.गणेश आप्पा सातपुते – उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य मनसे, हेमंत संभूस – सरचिटणीस महाराष्ट्र राज्य मनसे, नगरसेवक सचिन चिखले – अध्यक्ष पिंपरी चिंचवड मनसे, रुपेश म्हाळसकर – अध्यक्ष मावळ तालुका मनसे, सचिन भांडवलकर – अध्यक्ष पुणे जिल्हा रस्ते आस्थापना, मावळ तालुका कोर कमिटी सदस्य – सुरेश जाधव, संजय शिंदे, ज्योतीताई पिंजण, तानाजी तोडकर, अनिल वरघडे आदी मान्यवर व अन्य आजी – माजी पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.