Maval News : जवन -शिळींब- घुसळखांब रस्त्याच्या कामासाठी 25 कोटी मंजूर 

एमपीसी न्यूज – पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात पवना धरण व खडकवासला धरणामुळे पर्यटन क्षेत्राला मोठा वाव आहे. त्यामुळे मावळमधील प्रमुख जिल्हा मार्ग क्र. 26 मधील जवन ते शिळींब-मोरवे-घुसळखांब आणि प्रमुख जिल्हा मार्ग क्र. 106 या रस्त्यांची हायब्रीड ॲन्युईटी अंतर्गत कामे करण्यासाठी तातडीने 25 कोटी रुपये देण्यात येणार आहे. येत्या मार्चपर्यंत या रस्त्यांची कामे पूर्ण करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिले आहेत.

मावळ तालुक्यातील जवन-घुसळखांब या गावामध्ये असलेल्या प्रमुख जिल्हा मार्ग क्र.26 व 106 च्या कामासंदर्भात मंत्रालयात बैठक झाली. त्यावेळी अशोक चव्हाण यांनी हे निर्देश दिले. सचिव (रस्ते) उल्हास देबडवार, उपसचिव बस्वराज पांढरे यांच्यासह पुण्याचे मुख्य अभियंताही व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठकीस उपस्थित होते.
मावळ तालुक्यातील शिळींब गावामधून जाणारा प्रमुख जिल्हा मार्ग 26 व 106 या रस्त्याची एकूण 19.08 किमी लांबी आहे. त्यापैकी 11.95 किमी लांबीच्या रस्त्याचे डांबरीकरण व 7.13 किमी लांबीच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण हायब्रीड ॲन्युईटी अंतर्गत करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या रस्त्याच्या कामासाठी परवाने मिळाले असून हे काम तातडीने सुरू करण्याचे निर्देश चव्हाण यांनी यावेळी दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.