Maval : हमी भावाने भात खरेदी अन् तात्काळ पैसे मिळाल्याने मावळ मधील भात उत्पादक शेतकरी सुखावला

एमपीसी न्युज – मावळ तालुक्यातील इंद्रायणी भात उत्पादक शेतकऱ्यांचा भात हमीभावाने खरेदी केला जात आहे. त्याचबरोबर खरेदी केलेल्या दिवशीच शेतकऱ्यांना त्याच्या मालाचे पैसे मिळत आहेत. यामुळे तालुक्यातील भात उत्पादक शेतकरी सुखावला आहे. (Maval) आमदार सुनिल शेळके आणी सहकार महर्षी माऊली दाभाडे यांच्या संकल्पनेतून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सहकार्याने तालुक्यातील विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांकडून ही भात खरेदी केली जात आहे.

मावळ तालुक्यातील विविध कार्यकारी सहकारी सोसायट्याच्या कडुन शेतक-यांचा “इंद्रायणी भात “खरेदी हमीभावाने सुरू करण्यात आल्याने भात उत्पादक शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. तर खरेदी केलेल्या भाताचे  “पेमेंट ” लगेच  मिळत असल्याने शेतकरी समाधान आणी आनंद व्यक्त  करीत आहेत.

मावळ तालुक्याचे आमदार सुनिल शेळके आणी सहकार महर्षी माऊली दाभाडे यांचे संकल्पनेतून ही हमीभाव योजना मावळ तालुक्यात  राबविली  जात आहे.(Maval)  यासाठी  पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक भरीव अर्थ सहाय्य करीत आहे. तालुक्यातील  55 सहकारी शेती विकास सोसायट्या  ” भात” खरेदी  योजना राबवित आहे.

Gutkha seized : भोसरी व वाकड येथील कारवाईमध्ये 60 हजारांचा गुटखा जप्त

मावळ तालुक्यातील भात पिकांची कापणी नुकतीच संपलेली आहे.  काही शेतकऱ्यांनी आपल्या भाताची झोडणी पुर्ण केली आहे. यावर्षी  प्रथमच शेती विकास सोसायट्या  शेतकऱ्यांचे  24 रुपये हमीभावाने  खरेदी करीत आहे.आतापर्यंतचा हा सर्वात जास्तीचा हमीभाव आहे. विशेष म्हणजे शेतक-यांना त्याच दिवशी आपल्या  मालाच्या   वजनाप्रमाणे पेमेंट दिले जात आहे. लागलीच पैसे मिळत असल्याने शेतकरी समाधान आणि आनंद व्यक्त करीत आहेत.

भात  खरेदीच्या पहिल्या टप्प्यात  नवलाख उंबरे, ताजे, चिखलसे, सुदुंबरे,चावसर, उर्से,धामणे,वडेश्वर,निगडे,माळेगांव, बेबेड,ओव्हळ,आढले कार्ला या 13 सोसायट्यानी भात खरेदी जोरात सुरू केलेली आहे.

यासाठी सचिव संजय ढोरे,धर्मा ठोंबरे, संभाजी केदारी,सुनिल गाडे,रामदास  पाठारे,गुलाब ढोरे, उमेश वाडेकर, अंकुश पिंपरकर,रविंद्र हिंगे, तुकाराम  लोहोर,सचिन भानुसघरे हे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे वरिष्ठ अधिकारी नीरज पवार यांचे मार्गदर्शनाखाली भात खरेदीचे काम करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.