Nationalist Congress Party : मावळ तालुका राष्ट्रवादीकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव;राष्ट्रवादीचा वर्धापनदिन आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या 23 व्या वर्धापन दिनानिमित्त आणि संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक सेलच्यावतीने (Nationalist Congress Party)  दहावी व बारावीच्या परीक्षेत यश मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन शिबिर देखील घेण्यात आले. हा कार्यक्रम रविवारी (दि. 26) वडगाव मावळ येथील शासकीय विश्रामगृहात पार पडला. 
वडगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक सेल व आशादिप कम्प्युटर्स मावळ यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमात तीनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

 

 

Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण

 

या कार्यक्रमास मावळ तालुक्याचे आमदार सुनिल शेळके,मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष गणेश खांडगे, संत तुकाराम साखर कारखान्याचे उपाध्यक्ष  बापुसाहेब भेगडे,वडगांव शहराचे नगराध्यक्ष मयुर ढोरे, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस वरिष्ठ उपाध्यक्ष पंढरीनाथ ढोरे,मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अल्पसंख्याक (Nationalist Congress Party) अध्यक्ष अमिर ऊर्फ बाबा भाई मुलाणी,वडगांव शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रविण ढोरे, नगरसेवक सुनिल ढोरे या प्रसंगी उपस्थित होते.

 

 

कार्यक्रमाचे नियोजन मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष अमीर उर्फ बाबाभाई मुलाणी व मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अल्पसंख्याक सेलचे उपाध्यक्ष ताहिर मोमीन आणि वडगांव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अल्पसंख्याक पदाधिकारी व‌ मावळ तालुका कार्यकर्ते यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.