Maval : हिंदवी स्वराज्य ग्रुपच्या वतीने शिक्षकांचा सत्कार; विद्यार्थ्यांना ओळखपत्राचे वाटप

एमपीसी न्यूज – हिंदवी स्वराज्य ग्रुपच्या वतीने शिक्षकांचा सत्कार समारंभ 2019 नुकताच पार पडला. तसेच यावेळी विद्यार्थ्यांना ओळखपत्राचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. पुणे जिल्ह्यतील मावळ -मुळशी येथील हिंदवी स्वराज्य ग्रुप आणि आयटी पार्क माणचे माजी उपसरपंच रविभाऊ बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.

तसेच हिंदवी स्वराज्य ग्रुप मुळशी तालुक्यातीचे सदस्य आदित्य साठे, कपिल तावरे, कुणाल तावरे, अनिकेत बोडके, सोमेश बोडके, ॠषीकेश बोडके व इतर सर्व सदस्य यांच्या वतीने श्री संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालय दिवड गाव (ता. मावळ) येथील शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांना ओळखपत्र वाटप करण्यात आले. शाळेतील मुख्याध्यापकांनी सर्व ग्रुपच्या सदस्यांचे आभार मानले.

यावेळी ग्रुपचे संस्थापक-अध्यक्ष गणेश सतु साठे, उपाध्यक्ष देवाभाऊ खोंडगे, युवा उद्योजक नितीन भोईर, हिंदवी स्वराज्य ग्रुप मावळ तालुक्याचे सदस्य नाथाभाऊ खोंडगे, गणेश इंगळे, शिवभक्त- अजित भाऊ शिंदे, सुनिल खोंडगे,शंकर खोंडगे, अक्षय मालपोटे, आकाश लोखरे आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.