Maval : मावळातील वडिवळे पुलाचा पर्यायी रस्ताही गेला वाहून; 9 गावांचा संपर्क तुटला

एमपीसी न्यूज – मावळ परिसरात मान्सून पावसाने हळूहळू जोर (Maval) धरला असून कामशेत व आसपासच्या ग्रामीण भागाला जोडणाऱ्या वडिवळे पुलाचा पर्यायी रस्ता देखील पावसामुळे शुक्रवारी (दि.30)पहाटे वाहून गेला आहे. यामुळे कामशेत व नाणे मावळ यांच्यातील नऊ गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे.

मागील चार महिन्यापासून वडिवळे येथे नवीन पुलाचे काम सुरू होते, मात्र हे काम संथ गतीने सुरू असल्याने पुलाला पर्यायी कच्चा रस्ता तयार करून देण्यात आला होता.

तो रस्ताही पावसामुळे आज वाहून गेला आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. दरवर्षी वडिवळे पूल हा पावसामुळे पाण्याखाली जातो. यामुळे आसपासच्या परिसरात राहणारे विद्यार्थी व नागरिक यांचे प्रचंड हाल होतात, याला पर्याय म्हणूनच नवीन पुलाचे काम हाती घेण्यात आले होते.

मात्र, कंत्राटदाराच्या ढिसाळपणामुळे चार महिन्यानंतरही (Maval) हा पूल उभा राहू शकलेला नाही व त्याला जो पर्यायी रस्ता दिला होता, तो देखील पाण्याखाली वाहून गेला आहे.

 नागरिकांनी दळणवळण कसे करायचे? असा प्रश्न उपस्थित राहिला असून ही परिस्थिती अशीच राहिली, तर विद्यार्थ्यांचे व आसपासच्या दुग्ध व्यवसायिकांचे मोठे नुकसान होणार आहे.

त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर उपाययोजना करत नागरिकांची पर्यायी सुविधा करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.

पूल वाहून गेल्यानंतर स्थानिक राजकीय नेत्यांनी तेथील पाहणी केली असून प्रशासनाकडे या संदर्भात लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.

यावेळी प्रशासनाने येथे दीड महिन्यात काम पूर्ण करू असे आश्वासन दिले आहे. मात्र, पावसाळ्यात मावळातील परिस्थिती पाहता दीड महिन्यात हे काम पूर्ण होईल का? अशी शंका आता उपस्थित होत आहे.

Nigdi : सत्यम ज्वेलर्स म्हणजे अलंकाराच्या कणा-कणांत अप्रतिम सुंदरता!

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.