Nigdi Flyover News : भक्ती-शक्ती उड्डाणपुलाचे महापौरांच्या हस्ते उदघाटन

उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने भक्ती शक्ती चौक, निगडी येथील पुणे-मुंबईकडे व मुंबई-पुणेकडे जाणा-या महामार्गावरील नव्याने बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे उद्घाटन आज (गुरुवारी, दि. 10) महापौर उषा ऊर्फ माई ढोरे यांच्या हस्ते झाले.

 

भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे, उपमहापौर केशव घोळवे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, कला, क्रिडा, साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती उत्तम केंदळे, मनसे गटनेते सचिन चिखले, अपक्ष आघाडीचे गटनेते कैलास बारणे, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, ब प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर, नगरसेविका सीमा सावळे, आशा धायगुडे- शेंडगे, शैलजा मोरे, कमल घोलप, सुमन पवळे, नगरसेवक अमित गावडे, सह शहर अभियंता श्रीकांत सवणे, सतिश इंगळे, विजय भोजणे, उप आयुक्त चंद्रकांत इंदलकर, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता प्रमोद ओंभासे, माहिती व जनसंपर्कचे प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने भक्ती शक्ती चौकामध्ये उड्डाणपुलाचे काम मोठ्या प्रमाणात सुरु आहे. भक्ती शक्ती चौकात उड्डाणपूल, रोटरी मार्ग बनविण्यात येत आहे. मागील दोन वर्षांपासून उड्डाणपुलाचे काम सुरु आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी आणखी काही महिन्यांचा कालावधी लागणार आहे.

दरम्यान, उड्डाणपुलाच्या कामासाठी महामार्गावरील वाहतूक वळवण्यात आली होती. महामार्गावरील वाहनांना मोठा वळसा घालून जावे लागत होते. आता उड्डाणपूल सुरु झाल्याने पिंपरी-चिंचवडमधून जुना पुणे-मुंबई महामार्गावरून विनाअडथळा जाता येणार आहे.

निगडी येथे उभारण्यात आलेल्या या उड्डाणपुलाची लांबी सुमारे 849 मीटर असून रुंदी सुमारे 17.2 मीटर आहे. तर उंची सुमारे 8.5 मीटर एवढी आहे. या कामासाठी सुमारे 24 कोटी 62 लाख रुपयांचा खर्च करण्यात आलेला आहे. पुणे मुंबई रस्त्याला समांतर उड्डाणपूलाखालुन बीआरटी टर्मिनल व पीएमपीएमएल डेपोकडून सर्व बसेस सहज धावणार असून प्रवासाच्या वेळेत व इंधन बचत होणार असून वायू प्रदुषणात घट होऊन पर्यावरण संवर्धनास हातभार लागणार आहे.

 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने भक्ती शक्ती चौकामध्ये उड्डाणपुलाचे काम मोठ्या प्रमाणात सुरु आहे. भक्ती शक्ती चौकात उड्डाणपूल, रोटरी मार्ग बनविण्यात येत आहे. मागील दोन वर्षांपासून चौकात काम सुरु आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी आणखी काही महिन्यांचा कालावधी लागणार आहे.

दरम्यान उड्डाणपुलाच्या कामासाठी महामार्गावरील वाहतूक वळवण्यात आली होती. महामार्गावरील वाहनांना मोठा वळसा घालून जावे लागत होते. आता उड्डाणपूल सुरु झाल्याने पिंपरी-चिंचवडमधून जुना पुणे मुंबई महामार्गावरून विनाअडथळा जाता येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.