Pune News : पायी जाणाऱ्या नागरिकांना लिफ्ट देऊन लुबाडणारी टोळी गजाआड

एमपीसी न्यूज : पायी जाणाऱ्या नागरिकांना लिफ्ट देण्याच्या बहाण्याने दुचाकीवर बसवून सुनसान ठिकाणी घेऊन जात त्यांना लुबाडणाऱ्या टोळीला पुणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. त्यांनी केलेले जबरी चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. दौंड पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ओमकार उर्फ काका महेंद्र गावडे (वय २१ वर्षे रा.बेटवाडी, होलेमळा ता.दौंड जि.पुणे), राजेश संभाजी बिबे (वय १९ वर्षे रा.गिरीम ता.दौंड जि.पुणे मूळ रा.माळेवाडी ता.जि.बिड), अजय ज्ञानेश्वर पवार वय १९ वर्षे रा.लोणीकाळभोर, एचपी गेटसमोर ता.हवेली जि.पुणे मूळ रा.गिरीम ता.दौंड जि.पुणे) आणि  .विशाल दिलीप आटोळे (वय २४ वर्षे रा.गोपाळवाडी , गोकुळनगर ता.दौंड जि.पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 5 डिसेंबर रोजी संजय मुनोत यांना दौंड येथे जाण्यासाठी दुचाकीवरून लिफ्ट देतो असे सांगून एक अनोळखी इसम त्यांना घेऊन गेला होता. त्यानंतर एका निर्मनुष्य ठिकाणी घेऊन जात त्यांच्याजवळील मोबाईल, रोख रक्कम दोन सोन्याच्या अंगठ्या, घड्याळ असा एक लाख 94 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. याप्रकरणी दौंड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास सुरू असताना गुन्हे शाखेच्या पोलिसांना कुरकुंभ येथे काही आरोपी चोरीचे सोने विकण्यासाठी आले असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून वरील आरोपींना अटक केली त्यांच्याकडे केलेल्या अधिक चौकशी त्यानी दौंड परिसरात जबरी चोरीचे दोन गुन्हे केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून 2 लाख 26 हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.