Pimple Saudagar : महापौर जाधव व नगरसेवक नाना काटे यांनी केली शाळा पाहणी

एमपीसी  न्यूज –  पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौर राहुल जाधव यांनी पिंपळे सौदागर येथील अण्णासाहेब मगर शाळेची पाहणी केली. महापालिकेतर्फे विद्यार्थ्यांनी शैक्षणिक तसेच अन्य सुविधाही पुरवल्या जात आहे. त्याचा लाभ पूर्णपणे विद्यार्थ्यांना होतो किंवा नाही, याची पाहणी महापौर जाधव आणि नगरसेवक नाना काटे यांच्याकडून करण्यात आली.

यावेळी महापौर राहुल जाधव व नगरसेवक नाना काटे यांनी विद्यार्थ्यांशी सवांद साधला. त्यांनी विद्यार्थ्यांना काही प्रश्न विचारले त्याचे अचूक उत्तरेही यावेळी विद्यार्थ्यांनी दिली. याप्रसंगी नुकत्याच शाळेचा लागलेल्या २०१८ या वर्षीचा इयत्ता १० वी चा निकाल हा कौतुकास्पद आहे. या यशाबद्दल शिक्षकांचे अभिनंदन महापौर जाधव व नाना काटे यांच्या वतीने करण्यात आले.

यावेळी वर्ग खोल्यांची, मैदानाची, पाहणी करण्यात आली. शाळेची पटसंख्या खूप चांगली आहे. पटसंख्या पाहता या शाळेला लागण्याऱ्या सोयी सुविधा वेळेवर देण्यात याव्या अश्या सूचना महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. महापौर राहुल जाधव यांचे शाळेच्या वतीने नगरसेवक नाना काटे यांनी स्वागत केले. यावेळी शिक्षण समिती सभापती सोनाली गव्हाणे, सदस्या अश्विनी चिंचवडे, नगरसेविका शारदा सोनवणे, निर्मला कुटे, शिक्षण समितीचे अधिकारी, शाळेतील शिक्षक वर्ग उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.