Pune News : गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

एमपीसी न्यूज – एमटीईच्या कनिष्ठ महाविद्यालयातील बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. एमटीई सोसायटीचे चेअरमन पृथ्वीराज देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

डॉ. प्रसाद केळकर, संजय कुलकर्णी, प्राचार्य विनायक पानसे, विद्यार्थी, पालक उपस्थित होते.

प्राचार्य विनायक पानसे म्हणाले, ”आपल्या भारतीय संस्कृतीत गुरुला ईश्वराचे स्थान दिले आहे; कारण गुरू आपल्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश घेऊन येतात. अस म्हणतात कि आई – वडील पंख देतात, त्या पंखात भरारी मारण्याचे बळ गुरुजन देतात. गुरु पौर्णिमा हा आपल्या गुरूंचा आभार मानण्यासाठी आणि कृतज्ञता दर्शविण्याचा, गुरु वंदना करण्याचा आणि गुरु दक्षिणा देण्याचा दिवस. गुणवंत विद्यार्थ्यांनी 13 जुलैच्या गुरु पौर्णिमेचीची वाट न बघता 8 जूनलाच, एप्रिल 2022 मध्ये झालेल्या इयत्ता 12 वीच्या परीक्षेत भाघोस यश मिळवून, आमची मान अभिमानाने उंच केली आहे. कुठल्याही गुरूला हीच गुरु दक्षिणा अपेक्षित असते”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.