Javed Sheikh : जावेद शेख यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त रक्तदान स्पर्धा; राष्ट्रवादी चषक, रोख पारितोषिक

एमपीसी न्यूज – आकुर्डीच्या विकासाचे शिल्पकार, युवकांचे प्रेरणास्थान राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नगरसेवक (Javed Sheikh) जावेद शेख यांच्या द्वितीय पुण्यस्मरणदिना निमित्त उद्या (रविवारी) भव्य रक्तदान स्पर्धेचे आयोजन केले आहे. 21 हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक ठेवण्यात आले आहे. याबाबतची माहिती राष्ट्रवादीचे पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे कार्याध्यक्ष इखलास सय्यद यांनी दिली.

झाकीर रमजान शेख, जावेद शेख मित्र परिवारातर्फे आयोजित भव्य रक्तदान स्पर्धा आकुर्डीतील बजाज ऑटो समोरील हॉटेल सिल्वर सेवन येथे रविवारी सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत होणार आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व सार्वजनिक मंडळे, सामाजिक संस्था, प्रतिष्ठान, फाउंडेशन, ट्रस्ट, सेवाभावी संस्था, गृह निर्माण सोसायट्या यांच्य्यासह सर्व व्यक्तिगत युवक- युवती यांना सहभाग घेता येईल.

Pune News : गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

प्रथम पारितोषिक 21 हजार रुपये, द्वितीय पारितोषिक 15 हजार रुपये, तृतीय पारितोषिक 7 हजार रुपये आणि   उत्तेजनार्थ 5 हजार रुपयांची तीन पारितोषिके असणार आहेत. प्रत्येक रक्तदात्याला ‘ब्लू टूथ’ हेडफोन भेट देण्यात येणार आहे. रक्तदान स्पर्धा संपल्यानंतर सायंकाळी साडेपाच वाजता पारितोषिक वितरण होणार आहे. ज्या सार्वजनिक संस्थाचे जास्तीत जास्त रक्तदाते सहभागी होतील. त्या संस्थेला ‘राष्ट्रवादी चषकासह रोख पारितोषिक (Javed Sheikh) दिले जाणार आहे. रक्तदान स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणा-या संस्थांनी प्रकाश परदेशी यांच्याशी 9272189242 या नंबरवर संपर्क साधून नाव नोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.