Lonavala : भारत बंदला संमिश्र प्रतिसाद

एमपीसी न्यूज – इंधन दरवाढीच्या विरोधात काँग्रेस, र‍ाष्ट्रवादी काँग्रेस व विविध विरोधी पक्षांनी पुकारलेल्या भारत बंदला आज लोणावळ्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. 

गवळीवाडा नाका भागातील दुकाने व हाॅटेल कडकडीत बंद ठेवण्यात आले होते. तर बाजारपेठेतील सर्व व्यावहार नियमित सुरु होते. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शहरात निषेध रॅली काढत शिवाजी चौकात भाजपाचा निषेध व्यक्त केला. अनेक मान्यवरांनी यावेळी मार्गदर्शन करताना भाजपाच्या फसव्या घोषणांचा समाचार घेतला. इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आले असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.