Sunil Shelke : आमदार सुनील शेळके यांनी घेतले वडगावमधील गणपतींचे दर्शन

एमपीसी न्यूज – मावळचे आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांनी वडगावमधील गणपतींचे दर्शन घेतले. शहरातील गणेशोत्सव मंडळांच्या भेटी घेऊन त्यांनी गणराया चरणी प्रार्थना केली.

गणेशोत्सवानिमित्त वडगाव शहरातील मंडळांच्या भेटी व गणरायाच्या दर्शनासाठी ‘वडाचा गणपती’ जय मल्हार ग्रुप सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास मावळचे आमदार सुनील शेळके व समवेत मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष गणेश खांडगे यांनी भेट दिली.

यावेळी वडगाव नगरपंचायतचे नगराध्यक्ष मयूर ढोरे, उपनगराध्यक्ष राजेंद्र कुडे, नगरसेवक चंद्रजित वाघमारे, नगरसेविका पुजा वहिले, सायली म्हाळसकर, माजी उपसरपंच पंढरीनाथ ढोरे, वडगाव शहर अध्यक्ष प्रविण ढोरेसह मोठ्या संख्येने पदाधिकारी, मंडळाचे कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

यावेळी जय मल्हार (Sunil Shelke) ग्रुप सार्वजनिक गणेशोत्सवाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या हस्ते आमदार सुनील शेळके व तालुका अध्यक्ष गणेश खांडगे यांचा सत्कार करण्यात आला.

Congress : कैलास कदम हा सर्व सामान्य कामगारांचा साथी : मोहन जोशी

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.