Vadgaon : डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन पायी वारी करणाऱ्या महिलांचा मनसेकडून सन्मान

एमपीसी न्यूज – पंढरपूर वारीसाठी प्रस्थान होणाऱ्या दिंड्या, विणेकरी तसेच महिलांचा मनसेच्या वतीने सन्मान करण्यात आला. उपनगराध्यक्षा सायली रुपेश म्हाळसकर यांच्या वतीने दिंडीत तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन हरी नामाचा गजर करत-करत पायी चालणाऱ्या महिला-भगिनींचा साडीचोळी देऊन सन्मान करण्यात आला.
आखिल भारतीय वारकरी मंडळ मावळ तालुका व श्री क्षेत्र पोटोबा देवस्थान संस्थान वडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने पोटोबा महाराज मंदिर प्रांगण येथे हा सन्मान सोहळा पार पडला. यावेळी या सन्मानाचे वाटप मनसे महीला आघाडी मावळ तालुका अध्यक्षा ज्योती पिंजन, मनसे महिला आघाडी वडगाव शहर अध्यक्षा अर्चना ढोरे, उपाध्यक्षा सुषमा म्हाळसकर तसेच उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.
कार्यक्रम प्रसंगी मावळ लोकसभा क्षेत्राचे खासदार श्रीरंग बारणे, मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर व विश्वस्त मंडळी उपस्थित होते.
https://youtu.be/s3EZk1wzMiw

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.