Bhosari : मोबाईलमध्ये रमलेल्या तरुणाचा मोबाईल हिसकावला; दोघांना अटक

एमपीसी न्यूज – मोबाईलवर आलेले मेसेज वाचण्यात रमलेल्या तरुणाचा दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी मोबाईल हिसकावून नेला. ही घटना बुधवारी (दि. 29) सायंकाळी चारच्या सुमारास भोसरी एमआयडीसी मधील अनुकूल कंपनीसमोर घडली. याप्रकरणी  एमआयडीसी भोसरी पोलिसांनी दोन मोबाईल चोरांना अटक केली.

शरद शांताराम खवणेकर (वय 24, रा. हनुमानवाडी, आळंदी-चाकण रोड, आळंदी) यांनी याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार शुभम नीतीन काळभोर (वय  18), अमर राम पोटभरे (वय 20, दोघे रा. भिमशक्तीनगर, मोरेवस्ती, चिखली) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद हे बुधवारी सायंकाळी चारच्या सुमारास भोसरी एमआयडीसी मधील अनुकूल कंपनीसमोरुन मोबाईलमध्ये आलेले मेसेज वाचत पायी जात होते. त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्या शुभम आणि अमर यांनी शरदचा मोबाईल हिसकावून नेला. यावरुन शरद यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोदवला. पोलिसांनी आरोपींचा तपास घेत दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या. एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब बांबळे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.