Monsoon News : दोन दिवस अगोदरच मॉन्सून महाराष्ट्रात दाखल

एमपीसी न्यूज – दोन दिवस अगोदरच मॉन्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. रत्नागिरीच्या हर्णे बंदरावरून मॉन्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. येत्या काही दिवसात संपूर्ण महाराष्ट्र मॉन्सून व्यापून काढणार आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.

मॉन्सूनने शनिवारी (दि. 5) गोवा, दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्राचा दक्षिण भाग व्यापला आहे. मॉन्सून प्रगतीची उत्तरसीमा हर्णे, सोलापूर, रायचूर, करनूल, तिरुपती, कुड्डलूर येथून जात आहे.

पुढील 24 तासांत मॉन्सून महाराष्ट्रात आणखी प्रगती करण्याची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे.

रत्नागिरीच्या हर्णे बंदरावरून मॉन्सूनचा महाराष्ट्रातील प्रवास सुरु झाला आहे. हा मॉन्सून पुढे दक्षिण मध्य महाराष्ट्र सोलापूर पर्यंत, मराठवाड्याच्या काही भागात पोहोचून पुढे संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार आहे.

3 जून रोजी लक्षद्वीप, दक्षिण केरळ आणि दक्षिण तामिळनाडूत सक्रिय झालेला मॉन्सून शुक्रवारी केरळ आणि तामिळनाडू व्यापून पुढे कर्नाटकच्या दिशेने निघाला. 4 जून रोजी कर्नाटकच्या किनारपट्टीसह रायलसीमाच्या काही भागात दाखल झाला.

त्यानंतर गोव्यासह कर्नाटकचा उर्वरित अंतर्गत भाग व्यापून आंध्रप्रदेश, तेलंगण आणि दक्षिण कोकणासह महाराष्ट्राच्या दक्षिण सीमेवर मॉन्सून 5 जून (आज, शनिवारी) रोजी दाखल झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.