_MPC_DIR_MPU_III

Monsoon Session: राज्याचे पावसाळी अधिवेशन 22 जून ऐवजी 3 ऑगस्टपासून

Monsoon Session: State monsoon session from 3rd August instead of 22nd June चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानभरपाईच्या निकषात बदल करणार असल्याचे त्यांनी म्हटले.

एमपीसी न्यूज- राज्यातील आगामी पावसाळी अधिवेशनाला दि. 22 जून ऐवजी 3 ऑगस्टपासून सुरु होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना यासंबंधी माहिती दिली आहे. कोरोना विषाणूची साथ सुरू झाल्याने आठवडाभर आधीच अर्थसंकल्पीय अधिवेशन गुंडाळण्यात आले होते. कोरोनाच्या रुग्णांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पावसाळी अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट होते. परंतु, मुख्यमंत्री ठाकरेंच्या घोषणेनंतर आता याबाबत स्पष्टता आली आहे.

_MPC_DIR_MPU_IV

तत्पूर्वी, पावसाळी अधिवेशन 22 जूनपासून सुरू होईल असे जाहीर करण्यात आले होते. परंतु, 30 जूनपर्यंत सर्व रेल्वे आरक्षण रद्द झाल्याने राज्याच्या विविध भागातून आमदार आणि त्यांचे कर्मचारी मुंबईत कसे येणार तसेच गर्दीही होईल. त्यामुळे हे अधिवेशन पुढे ढकलण्यात आले आहे.

_MPC_DIR_MPU_II

दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या रायगड व कोकणातील इतर भागासाठी मदतीबाबत माहिती दिली. मंत्रिमंडळाच्या बैठकीत चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतल्याचे त्यांनी सांगितले.

चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानभरपाईच्या निकषात बदल करणार असल्याचे त्यांनी म्हटले. त्याचबरोबर सप्टेंबरपर्यंत सर्व शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करणार असल्याचेही ते म्हणाले.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.