Pune : मोपेडची मोटारसायकलला धडक; एकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – येरवडा येथे सह्याद्री हॉस्पिटल समोरील रोडवर एका मोपेड गाडीने मोटारसायकलला धडक दिली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवार रात्री साडेदहाच्या दरम्यान घडली. याप्रकरणी रवींद्र खरात (वय 37, रा. अंगणवाडी बोपखेल), यांनी फिर्याद दिली.

महादेव धुरंधर, असे मयत झालेल्या इसमाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी रवींद्र सह्याद्री रोडने त्यांचा मित्र महादेव याच्यासह जात होते. यावेळी एक अनोळखी महिला मोपेड चालकने भरधाव येत रविंद्र यांच्या मोटारसायकलला धडक दिली. यामध्ये रवींद्र किरकोळ जखमी झाले. मात्र, महादेव यांना छातीला आणि डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर मोपेड चालक महिला ही अपघाताची खबर न देता तेथून पळून गेल्या आहेत.

दरम्यान, याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.