Moshi : ‘कॅान्स्ट्रो’मुळे भारताची आंतरराष्ट्रीय ओळख – राहुल महिवाल

एमपीसी न्यूज – ‘कॅान्स्ट्रो’ एक्स्पोमुळे पिंपरी-चिंचवड (Moshi) आणि पुणे महानगराच्या लौकिकात भर पडत आहे. चीन आणि इतर देशांपेक्षा अधिक चांगल्या सुविधा, तंत्रज्ञान आपल्याकडे आहेत, आपण जागतिक स्पर्धेत सरस असल्याचे अशा प्रदर्शनांमधून दिसून येते, असे मत पुणे महानगर आयुक्त राहुल महिवाल यांनी व्यक्त केले.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) मोशी येथील अत्याधुनिक आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र (पीआयईसीसी) येथे कॅान्स्ट्रो 2024 या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे 4 ते 7 जानेवारी 2024 दरम्यान आयोजन केले आहे. पीएमआरडीए आयुक्त राहुल महिवाल यांच्या हस्ते गुरुवारी या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. व्हर्च्यूअल कॉन्स्ट्रो प्रदर्शनाचेही यावेळी उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. वास्तू विशारद विलास अवचट, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे, ‘कॉन्स्ट्रो’चे अध्यक्ष जयंत इनामदार, पुणे कन्स्ट्रक्शन इंजिनीरिंग अँड रिसर्च फौंडेशनचे (पीसीईआरएफ) अध्यक्ष नरेन कोठारी, सचिव शिरीष केंभवी, संजय वायचळ आदी उपस्थित होते.

Pune : पुणे लोकसभा मतदारसंघावरून महाविकास आघाडीमध्ये जुंपण्याची चिन्हे

राहुल महिवाल म्हणाले, पुणे महानगर क्षेत्रात पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. यात पीएमआरडीएचा रिंग रोड, नदी सुधार, माण-शिवाजीनगर मेट्रो यासह विविध प्रकल्पांचे काम सुरू आहे. यात बांधकाम क्षेत्राचा (Moshi) मोलाचा वाटा आहे. त्यामुळे बांधकाम क्षेत्रातील संशोधन, नवतंत्रज्ञान, कार्यप्रणाली याची सांगड घालणे आवश्यक आहे. काॅन्स्ट्रो प्रदर्शन त्यासाठी मैलाचा दगड ठरत आहे.

जयंत इनामदार म्हणाले, अभियांत्रिकी क्षेत्रातील विद्यार्थी, व्यावसायिक आणि उद्योगांना एकाच छताखाली आणण्याचे काम काॅन्स्ट्रोच्या माध्यमातून केले आहे. बांधकाम उद्योगातील अद्ययावत यंत्रसामग्री, साहित्य, पद्धती आणि तंत्रज्ञान प्रदर्शनात आहे. ‘लेटेस्ट मेथड ॲण्ड टेक्नाॅलॉजी’ ही यंदाच्या प्रदर्शनाची संकल्पना आहे.

नरेन कोठारी प्रास्ताविकात म्हणाले, कॉन्स्ट्रो इंटरनॅशनल एक्स्पोची ही 18 वी मालिका आहे. 30 हजार चौरस मीटर जागेवर हे प्रदर्शन भरवले आहे. पीसीईआरएफ यांच्यातर्फे आयोजित प्रदर्शनात पीएमआरडीए कन्सेप्ट पार्टनर तर पिंपरी-चिंचवड महापालिका सहयोगी भागीदार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.