Moshi News: ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पातून ‘पॉवर लाईन’च्या कामाचा प्रारंभ

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका (Moshi News) प्रशासनाच्या पुढाकाराने उभारलेला राज्यातील ‘रोलमॉडेल’ प्रकल्प ‘वेस्ट टू एनर्जी’ अर्थात कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आले असून, त्यामाध्यमातून अवघ्या 5 रुपये प्रतियुनिटप्रमाणे प्रशासनाला वीज मिळणार आहे. त्यासाठी प्रकल्पापासनू ‘पॉवर लाईन’ टाकण्याच्या कामाला सुरूवात करण्यात आली.

मोशी कचरा व्यवस्थापन केंद्र येथे कचऱ्यापासून वीज निर्मितीच्या प्रकल्प उभारण्यात आला आहे. त्याचा पुढचा टप्पा म्हणजे कचरा व्यवस्थापन केंद्रापासून महावितरणच्या इंद्रायणी सबस्टेशनपर्यंत ‘पॉवर लाईन’ टाकण्यात येत आहे. या कामाचे भूमिपूजन भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी महावितरणचे कार्यकारी अभियंता उदय भोसले, दिपक मदने, प्रमोद भोसले, मोहिनी गुळुमकर यांच्यासह पिंपरी-चिंचवड महापालिकेचे कार्यकारी अभियंता अनिल भालसाखले, उपकार्यकारी अभियंता सत्वशील शितोळे, कनिष्ठ अभियंता दशरथ वाघोले, संदीप जाधव यांच्यासह लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

महापालिकेचे कार्यकारी अभियंता अनिल भालसाखले म्हणाले की, पिंपरी-चिंचवड महानगपालिकेच्या ‘वेस्ट टू एनर्जी’ या प्रकल्पाचे काम अखेरच्या टप्यात आसून, ‘पॉवर लाईन’ टाकण्याचे काम सुरू झाले आहे. साधारण ’पॉवर लाईन’ ची लांबी 4.5 किलोमीटर इतकी आहे. या प्रकल्पातून निर्माण होणारी वीज प्रति युनिट 5 रुपये प्रमाणे आगामी 20 वर्षांकरिता प्रशासनाला मिळणार आहे. यामुळे महापालिकेच्या वीज बिलामध्ये बचत होणार असून, कचऱ्याचा (Moshi News) प्रश्नही सुटण्यास मदत होणार आहे. प्रकल्पाची वीज निर्मिती क्षमता दिवसाला 14 मेगा वॅट इतकी आहे.

Pimpri : नृत्यकला मंदिरच्या नृत्य कार्यशाळेचे निगडीत उदघाटन  

पिंपरी-चिंचवड शहराच्या स्थापनेपासून मोशी कचरा डेपोवर कचरा टाकला जातो. त्यामुळे कचऱ्याचे डोंगर निर्माण झाले. परिणामी, पर्यावरण आणि नागरी आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. ‘‘भोसरी व्हीजन-2020’’ च्या माध्यमातून आम्ही ‘वेस्ट टू एनर्जी’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला. हा प्रकल्प कार्यान्वयीत होत असून, लवकरच निर्माण होणारी वीज महापालिका प्रशानाला मिळणार आहे. त्यामुळे आश्वासन पूर्तीचा आनंद आहेच. त्यासोबत शहरातील कचरा समस्या सोडवण्यात यश मिळत आहे. याचे समाधान वाटते, असे आमदार लांडगे म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.