Technology News : ‘या’ दिवशी झाले व्हॉट्स ॲप वर सर्वात जास्त कॉल्स

एमपीसी न्यूज : 2020 मध्ये सर्वच जण कोरोनामुळे हैराण झाले. या वर्षभरात सर्वच जण इंटरनेटच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात होते. अशा या ऑनलाईन वर्षाच्या शेवटच्या दिवशी व्हॉट्स ॲप वर तब्बल 1.4 कोटी व्हॉईस आणि व्हिडीओ कॉल्स केले गेले. व्हॉट्स ॲपवर एकाच दिवशी इतक्या जास्त प्रमाणात कॉल्स केले जाण्याची ही पहिलीच वेळ आहे.

कोविडमुळे यावर्षी लोकांनी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नववर्षाच्या शुभेच्छा जास्तीत जास्त देण्यावर भर दिला. मागील वर्षाच्या शेवटच्या दिवसापेक्षा यावर्षीच्या शेवटच्या दिवशी व्हॉट्स ॲपवर कॉलिंगचे प्रमाण हे तब्बल पन्नास टक्यांनी वाढले आहे.

इंस्टाग्राम आणि फेसबुकवर 55 लाखांपेक्षा जास्त लाईव्ह ब्रॉडकास्ट शेवटच्या दिवशी केले गेले. त्यामुळे 2020 चा शेवटचा दिवस सोशल मीडियासाठीही आगळावेगळा ठरला

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.