सोमवार, ऑक्टोबर 3, 2022

Most Corona Infected Cities: देशातील 70 टक्के कोरोना रुग्ण 13 शहरांमध्ये! त्या शहरांमध्ये पुण्याचाही समावेश

एमपीसी न्यूज – केंद्रीय कॅबिनेट सचिवांनी 13 देशातील सर्वाधिक कोरोनाबाधित शहरांमधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी तिथल्या जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त यांच्यासमवेत बैठक घेतली. या 13 शहरांमध्ये पुण्याचाही समावेश होता. संबंधित सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य सचिव बैठकीला उपस्थित होते.

ही बैठक महत्वपूर्ण होती कारण ही 13 शहरे सर्वाधिक कोरोना विषाणू बाधित ठिकाणे असून देशातील सुमारे 70 टक्के बाधित रुग्ण या शहरांमध्ये आहेत. या 13 शहरांमध्ये महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे आणि पुणे या तीन शहरांचा समावेश आहे. नवी दिल्ली (दिल्ली), अहमदाबाद (गुजरात), हैदराबाद (आंध्र प्रदेश), कोलकाता / हावडा (पश्चिम बंगाल), इंदूर (मध्य प्रदेश), जयपूर, जोधपूर (राजस्थान), चेन्नई, चेंगलपट्टू आणि तिरुवल्लूर (तमिळनाडू) यांचा समावेश आहे.

कोविड -19 बाधित रुग्णांच्या व्यवस्थापनासाठी महानगरपालिकांच्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी हाती घेतलेल्या उपाययोजनांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. केंद्र सरकारने शहरी वसाहतींमध्ये कोविड -19 च्या व्यवस्थापनाबाबत यापूर्वीच मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
या धोरणाच्या ठळक वैशिष्ट्यांमध्ये उच्च जोखीम घटक, बाधित रुग्णांचा दर, मृत्यूचा दर, रुग्णसंख्या दुपटीने वाढण्याचा दर, प्रति दहा लाख लोकांच्या चाचण्या यांसारख्या निर्देशांकावरील कामाचा समावेश आहे.

बाधित रुग्ण आणि त्यांच्या संपर्कात आलेल्यांचे मॅपिंग आणि त्यांचा भौगोलिक फैलाव यासारख्या घटकांच्या आधारे प्रतिबंधित क्षेत्र भौगोलिकदृष्ट्या परिभाषित केले जावेत यावर केंद्र सरकारने भर दिला. यामुळे एक परिभाषित परिमितीचे सीमांकन करण्यात आणि लॉकडाउनचे कठोर प्रोटोकॉल लागू करणे शक्य होईल.

निवासी वसाहती, मोहल्ला, महानगरपालिका वॉर्ड किंवा पोलिस स्टेशन परिसर, महानगरपालिका क्षेत्र, शहरे आवश्यकतेनुसार प्रतिबंधित क्षेत्र म्हणून नियुक्त करता येतील का, याबाबत महानगरपालिका निर्णय घेऊ शकतात.

जिल्हा प्रशासन आणि स्थानिक नागरी संस्थांनी स्थानिक पातळीवरील तांत्रिक माहितीसह या क्षेत्राची योग्य परिभाषा सुनिश्चित करावी, अशी सूचना या शहरांना करण्यात आली.

spot_img
Latest news
Related news