Chinchwad News : गिरीश प्रभुणे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल खासदार श्रीरंग बारणे यांनी केला सत्कार

एमपीसी न्यूज – वंचित, उपेक्षित, भटक्या समाजासाठी कार्य करणारे चिंचवड येथील क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष डॉ. गिरीश प्रभुणे यांना केंद्र सरकारचा ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाल्यानिमित्त शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी प्रभुणे यांचा सत्कार केला.

40 वर्षांपासून प्रभुणेकाका भटक्या समाजासाठी कार्य करत आहेत. त्यांच्या कार्याची केंद्र सरकारने दखल घेतली. त्यांना मिळालेल्या पद्मश्री पुरस्कारामुळे पिंपरी-चिंचवड शहराची मान उंचावल्याचे खासदार श्रीरंग बारणे म्हणाले. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, चापेकर समितीचे सहकार्यवाह रविंद्र नामदे, बशीर सुतार, गतीराम भोईर यावेळी उपस्थित होते.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, ”प्रभुणेकाकांनी भटक्या-विमुक्त समाजाच्या विकासासाठी आपले आयुष्य वेचले आहे. भटके-विमुक्त विकास परिषदेच्या माध्यमातून समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी ते अविरत कार्य करीत आहेत. वैदू, कैकाडी, पारधी समाजातील मुलांच्या कल्याणासाठी ते झटत आहेत. पुनरुस्थान समरसता गुरुकुलमच्या माध्यमातून भटक्या समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण देवून स्वत:च्या पायावर उभे करत आहेत. त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी,  त्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी त्यांचे कार्य  वाखण्याजोगे आहे”.

महापौर, पदाधिकाऱ्यांकडून अभिनंदन

पद्मश्री पुरस्काराबद्दल डॉ. गिरीश प्रभुणे यांचे पिंपरी- चिंचवड शहरवासीयांच्या वतीने महापौर उषा ढोरे, आमदार लक्ष्मण जगताप, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी अभिनंदन केले. यावेळी भाजप शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे, माजी खासदार अमर साबळे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, उपमहापौर केशव घोळवे, नगरसेवक शत्रुघ्न काटे, बाबू नायर, मोरेश्वर शेडगे, राजू दुर्गे, अमोल थोरात, नगरसेविका शारदा सोनवणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.