MP Supriya Sule : पोलिसांच्या उज्ज्वल प्रतिमेला काळिमा फासणारी घटना – सुप्रिया सुळे

अमोल कोल्हेंबरोबर घडलेल्या प्रकाराबाबत सुप्रिया सुळेंची नाराजी

एमपीसी न्यूज : छत्रपती संभाजी महाराजांवरील महानाट्याचे मोफत तिकीट दिले नाही म्हणून नाटक रोखण्याची धमकी दिल्याचा आरोप राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील काही पोलिसांवर केला आहे. कोल्हेंच्या आरोपानंतर आता विविध स्तरांतून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी यासंदर्भात तिव्र नाराजी व्यक्त केली आहे. ही पोलिसांच्या उज्ज्वल प्रतिमेला काळिमा फासणारी घटना असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. छत्रपती संभाजी महाराज यांचा देदिप्यमान इतिहास ‘शिवपुत्र संभाजी’  या महानाट्याच्या माध्यमातून नव्या पिढीपर्यंत अतिशय प्रभावी पद्धतीने पोहोचविण्याचा प्रयत्न खासदार डॉ अमोल कोल्हे करीत आहेत. (MP Supriya Sule) त्यांच्या या प्रयोगांना राज्यातील शिवप्रेमी जनता उदंड प्रतिसाद देत असताना पिंपरी चिंचवड येथील प्रयोगाच्या दरम्यान या महानाट्याच्या फुकट प्रवेशिकेसाठी येथील पोलिसांनी धमक्या दिल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्र पोलीसांच्या उज्ज्वल प्रतिमेला काळीमा फासणारी ही घटना असल्याचे सुप्रिया सुळे  यांनी म्हटले.

Chinchwad : खासदार अमोल कोल्हे यांची दिलीप सोनिगरा ज्वेलर्सला सदिच्छा भेट

खासदार असणाऱ्या डॉ. कोल्हे यांना अशा पद्धतीने धमकी दिली जाते ही अतिशय गंभीर बाब आहे. खासदारांना पोलीस अशी वागणूक देत असतील तर सर्वसामान्य नागरिकांची काय अवस्था असेल? राज्याच्या गृहमंत्र्यांनी याची तातडीने याची दखल घेऊन पोलीस खात्याची प्रतिमा मलीन करणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.