Mulshi Crime News : मुळशी खुर्द मधील खुनाचा उलगडा, एका आरोपीला अटक

एमपीसी न्यूज – मुळशी खुर्द येथे हाँटेल दिशाजच्या जवळ चिंचवड येथील मोहननगरचे शिवसेना माजी शाखाप्रमुख विजय सर्जेराव सुर्वे ( वय 40, रा. मोहननगर, चिंचवड) यांचा मृतदेह गावक-यांना सकाळी मिळून आला होता. याप्रकरणी पौड पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

आरोपी हर्षद अशोककुमार राठोड ( वय 29, रा. निगडी ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर, दुसरा आरोपी मोहम्मंद फरार झालेला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि. 10) सकाळी कामावर जाणाऱ्या नागरिकांना प्रथम दारू पिऊन कोणी पडले असेल म्हणून दुर्लक्ष केले. मात्र, हि पडलेली व्यक्ती पालथी पडलेली असून अंगातून रक्तस्त्राव येत होता.

असे काही नागरिकांच्या निदर्शनास आल्याने या घटनेची माहिती पौड पोलिसांना देण्यात आली. यानंतर पौड पोलिसांनी यातील हर्षद राठोड याला ताब्यात घेतले. हर्षद राठोड याची चौकशी केली असता त्याने त्याचा साथीदार मोहमंद याच्या मदतीने खून केल्याचे कबूल केले.

गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक कार्यालयातील सायबर विभागाचे पोलीस काँन्सटेबल सुनिल कोळी व चेतन पाटील यांनी विशेष सहकार्य केले. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.