Mumbai: लॉकडाऊनच्या काळात राज्यात 491 सायबर गुन्हे दाखल; 260 जणांना अटक

491 cyber crimes filed in the state during the lockdown; 260 arrested

एमपीसी न्यूज – लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये समाजमाध्यमांचा गैरवापर करून आक्षेपार्ह पोस्टस केल्याप्रकरणी 491 विविध गुन्हे महाराष्ट्र सायबरने दाखल केले असून 260 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्र सायबरच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी दिली.

आक्षेपार्ह संदेश, पोस्टर्स, व्हिडिओ, ट्विट पोस्टस, शेअर केल्याप्रकरणी प्लॅटफॉर्मनिहाय गुन्हे दाखल

व्हॉट्सॲप-  195गुन्हे
फेसबुक पोस्ट्स –  201 गुन्हे दाखल
टिकटॉक व्हिडिओ-  26 गुन्हे दाखल
ट्विटर – आक्षेपार्ह ट्विट – 9 गुन्हे दाखल
इंस्टाग्राम – चुकीच्या पोस्ट-  4 गुन्हे
अन्य सोशल मीडिया (ऑडिओ क्लिप्स, युट्यूब) गैरवापर –  56 गुन्हे दाखल

वरील सर्व गुन्ह्यांमध्ये आतापर्यंत 260 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

107 आक्षेपार्ह पोस्ट्स समाजमाध्यमांवरून हटविण्यात महाराष्ट्र सायबरला यश आले आहे.  लातूर जिल्ह्यातील देवणी पोलीस स्टेशनमध्ये एका नवीन गुन्ह्याची नोंद झाली असून, लातूर जिल्ह्यात नोंद झालेल्या गुन्ह्यांची संख्या 11 इतकी झाली आहे.

या गुन्ह्यातील आरोपीने कोरोना महामारीच्या काळात लोकांच्या धार्मिक भावना दुखावून दोन समाजात तेढ निर्माण होईल अशा आशयाचा मजकूर असणारी पोस्ट आपल्या फेसबुक प्रोफाईलवरून शेअर केली होती. त्यामुळे परिसरातील शांतता बिघडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकला असता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.