Mumbai : राज्यात सलग तिसऱ्यांदा दिवसभरात 500 रुग्णांना डिस्चार्ज -आरोग्यमंत्री राजेश टोपे

कोरोनाचे आज 1606 नवीन रुग्ण; राज्यात एकूण रुग्ण 30 हजार 706

एमपीसीन्यूज : राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 30 हजार 706  झाली आहे. आज 1606 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज524  कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात 7088 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या 22 हजार 479  रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 2  लाख 61  हजार 783 नमुन्यांपैकी 2 लाख 31 हजार 071  जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत.  तर 30  हजार 706 जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात 3 लाख 34  हजार 558  लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 17 हजार 48  लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात 67  करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. त्यापैकी 22  मृत्यू हे गेल्या 24 तासातील आहेत.  तर उर्वरित मृत्यू हे 14  एप्रिल ते 14  मे या कालावधीतील आहेत. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मधील 41, पुण्यात 7, ठाणे शहरात 7, औरंगाबाद शहरात 5, जळगावमध्ये 3, मीरा भाईंदरमध्ये 2, नाशिक शहरात 1 तर सोलापूर शहरामध्ये 1  मृत्यू झाला आहे.

आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी 47  पुरुष तर 20  महिला आहेत. आज झालेल्या 67  मृत्यूंपैकी 60  वर्षे किंवा त्यावरील 38  रुग्ण आहेत तर 25  रुग्ण हे वय वर्षे 40  ते 59  या वयोगटातील आहेत. तर 4 जण 40  वर्षांखालील आहे. या 67  रुग्णांपैकी 44  जणांमध्ये (66 टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.