Mumbai News : शिरोमणी अकाली दल शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट

एमपीसी न्यूज – दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिरोमणी अकाली दलाच्या एका शिष्टमंडळाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबईतील वर्षा बंगल्यावर भेट घेतली.

यावेळी शिष्टमंडळाशी चर्चा करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, “दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला आमचा पाठिंबा राहील. तसेच दोन आठवड्यानंतर होणाऱ्या बैठकीसाठी उपस्थित राहून शेतकरी आंदोलनाला आपला पाठिंबा जाहीर करणार आहेत.”

दरम्यान राष्ट्रवादीचे सर्वसर्वा शरद पवार म्हणाले, “हरियाणा आणि पंजाबमध्ये सर्वाधिक गव्हाचे उत्पादन घेतले जाते. शेतकऱ्यांचा प्रश्न लवकर सोडवला नाही, तर संपूर्ण देशातील शेतकरी आंदोलनात सहभागी होतील.

संसदेत जेव्हा हे बिल पास होत होते, त्यावेळी आम्ही केंद्र सरकारला विनंती केली होती की, बिल पास करण्यासंदर्भात कोणतीही गडबड करू नका. संबंधित समित्या आणि संघटनांशी चर्चा केली जावी पण असे घडले नाही. सरकारने अहंकारपोटी हे बिल पास केले. त्याचाच उद्रेक आता आंदोलनाच्या रूपाने बघायला मिळत असल्याचेही शरद पवार म्हणाले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.