Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आज दोन तासांचा ब्लॉक

एमपीसी न्यूज :- आज दुपारी मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावर 12 ते 2 या वेळेत ( Mumbai-Pune Expressway ) वाहतूक ब्लॉक घेतला जाणार आहे. ब्लॉकदरम्यान मुंबईकडून पुण्याच्या दिशेनं जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (MSRDC) माहिती देण्यात आली आहे.

Ind vs Aus T20 : ऑस्ट्रेलिया विरुद्ध टी-ट्वेंटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर ; सूर्यकुमार यादवकडे कर्णधार पदाची सूत्रे

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील पुण्याच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गिकेवर 35/500 किमी अंतरावर हायवे ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टीमअंतर्गत गँट्री उभारण्याचं काम एमएसआरडीसीकडून केलं जाणार आहे.त्याकरीता हा दोन तासांचा ब्लॉक असणार आहे.

ब्लॉकदरम्यान मुंबईकडून पुण्याकडे जाणाऱ्या हलक्या वाहनांची वाहतूक शेडुंग फाटा येथून वळवली जाणार असून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 जुना मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावरील शिंग्रोबा घाटातून द्रुतगती मार्गाच्या मॅजिक पॉईंट येथे पुन्हा मुंबई -पुणे द्रुतगती मार्गावर मार्गस्थ करण्यात येणार आहे. गँट्री बसवण्याचं काम पूर्ण झाल्यानंतर म्हणजेच, दुपारी 2 नंतर मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक ( Mumbai-Pune Expressway ) पूर्ववत केली जाईल.

 

Total
0
Shares
Related Posts
Total
0
Share