Mumbai-Pune Expressway Accident : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर भीषण अपघात

एमपीसी न्यूज – पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर (Mumbai-Pune Expressway Accident) खोपोली एक्झिट जवळ गॅसचा टॅकर विरुद्ध लेनमध्ये गेल्याने भीषण अपघात झाला. यावेळी समोरून येणारी वाहने टॅंकरवर आदळली, यामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. सोमवारी (दि. 09) सकाळी हा अपघात घडला.

दरम्यान, बोरघाट पोलीस यंत्रणा, आय आर बी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, लोकमान्य हॉस्पिटल, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल, अपघात ग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले.

Smuggling on Pune-Dubai – सोन्याची तस्करी करणाऱ्या दोघांना पुणे विमानतळावर अटक

खोपोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मदतकार्य सुरू करून अपघातग्रस्त वाहने (Mumbai-Pune Expressway Accident) बाजूला काढत खोळंबलेली वाहतूक अखेर सुरु करण्यात आली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.