Pimpri : खरचं भाजपमध्ये जाणार का, राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले…

एमपीसी न्यूज – भाजपच्या कोणत्याही नेत्यासोबत माझी बैठक झाली नाही. विरोधी पक्ष म्हणून राजकारणात संवाद असणे हे अत्यंत आवश्यक आहे. (Pimpri) कलाकृतीसाठी निमंत्रित करणे गरजेचे आहे. त्यातून जवळीक होते असे होत नाही असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी भाजप मध्ये जाण्याच्या चर्चेच्या प्रश्नावर उत्तर दिले.

छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित महानाट्य ‘शिवपुत्र संभाजी’ अभिनेते डॉ. अमोल कोल्हे साकारत आहेत. महाराष्ट्रभर या महानाट्याचे प्रयोग सुरू आहेत. ‘शिवपुत्र संभाजी’ या भव्यदिव्य बहुप्रतिक्षित महानाट्याचे  पिंपरीतील एच.ए मैदानावर 11 ते 16 मे दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. त्याबाबतची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राष्ट्रवादीच्या नेत्यांशी संवाद कमी झाला आहे का, असे विचारले असता ते म्हणाले,  लोकसभेतील गटनेत्या सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासोबत कालच माझे बोलणे झाले. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत आज बोलणे झाले आहे. त्यामुळे संवाद कुठेही कमी झाला नाही.

Alandi : नृसिंह जयंती निमित्त माऊलींच्या संजीवन समाधीवर साकारला भगवान नृसिंह अवतार

गेली सहा दशके महाराष्ट्राचे राजकारण शरद पवार यांच्याभोवती फिरत आहे. पक्षाध्यक्षपदाबाबत शरद पवार शुक्रवारी निर्णय घेतील. (Pimpri) पवार हे पूर्ण विचारांती निर्णय घेतील ही महाराष्ट्राला खात्री आहे. जो अध्यक्ष निवडला जाईल, तो पवार यांच्या मार्गदर्शनाखालीच काम करेल, असेही डॉ. कोल्हे म्हणाले.

 

.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.