BNR-HDR-TOP-Mobile

Nigadi : वीज भाड्याने घेण्यावरून दोघात तुंबळ हाणामारी

एमपीसी न्यूज – वीज भाड्याने घेण्यावरून दोघांचे भांडण झाले. यामध्ये एकाला दगडाने मारले. यामध्ये तो जखमी झाला. ही घटना मंगळवारी (दि. 25) दुपारी बाराच्या सुमारास स्पाईन रोड, निगडी येथे घडली.

अशोक नारायण तांबवे (वय 38, रा. ओटास्कीम, निगडी) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अतुल दिगंबर कसबे (वय 25, रा. ओटास्किम, निगडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी अशोक त्यांच्या मित्रासोबत स्पाईन रोडवर बोलत थांबले होते. त्यावेळी अतुल तिथे आला. ‘माझ्याकडून तू लाईट भाड्याने घे’ असे अतुलने अशोक यांना सांगितले. त्यासाठी अशोक यांनी ‘मला तुझी लाईट नको’ असे म्हणून नकार दिला. यावरून अतुलने शिवीगाळ करत अशोक यांना मारहाण केली.

अशोक यांच्या पायावर दगड मारून जखमी केले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून निगडी पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3