Nigdi : खिडकीत अडकलेल्या 6 वर्षाच्या मुलाची अग्निशमन दलाने केली सुखरूप सुटका

एमपीसी न्यूज़ : निगडी येथे सोमवारी दिनांक 10 एप्रिल रोजी (Nigdi) तब्बल आठ तास खिडकीत अडकलेल्या 6 वर्षाच्या मुलाची अग्निशमन दलाने सुखरूप सुटका केली. ही घटना तक्षशिला हाऊसिंग सोसायटीमध्ये घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, साधारण सकाळी दहाच्या सुमारास हा 6 वर्षांचा मुलगा खेळता खेळता घराच्या खिडकीत अडकला. एवढेच नव्हे तर त्याच्याकडून  मुख्य दरवाजा व खिडक्यासुद्धा लॉक झाल्या होत्या. यश बिदबाग असे या मुलाचे नाव आहे.

Thergaon : कबड्डी खेळाडूंना स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकांचे वाटप

तब्बल आठ तासांनी म्हणजे संध्याकाळी 7.30 च्या सुमारास प्राधिकरण अग्निशमन दलाला ही माहिती मिळाली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन मुख्य दरवाजा तोडून मुलाची सुखरूप सुटका केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.