Punavale : गोरगरिबांच्या घरांप्रमाणेच पुनावळे येथील अनधिकृत बांधकामावर तत्काळ कारवाई करा

माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांची मागणी

 एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचा अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण विभाग गोरगरिबांच्या अतिक्रमणावर तातडीने कारवाई करतो. (Punavale) मात्र, बलाढ्य बिल्डरांच्या अतिक्रमणावर कारवाईस टाळाटाळ, चालढकल केली जाते. नोटीसीचा खेळ केला जातो असा आरोप करत महापालिका प्रशासनाने पुनावळे – जांभे रस्ता, जमीन मिळकत क्र. 40/1, 4/2/1/अ व 40/2/2/अ येथील अनधिकृत बांधकामावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक  यांनी महापालिकेकडे केली आहे. 

याबाबत नाईक म्हणाले,  महापालिकेचे अधिकारी तसेच आयुक्त यांनी त्वरित पुनावळे येथील या अतिक्रमणावर कारवाई करावी आणि सर्वसामान्य जनतेला हे दाखवून द्यावे की नुसतेच आम्ही गोरगरिबांच्या अतिक्रमणावरच नव्हे तर बलाढ्य बिल्डरांच्या सुद्धा अतिक्रमणावर आम्ही कारवाई करतो. याबाबत कार्यकारी अभियंता आबासाहेब ढवळे यांची भेट घेतली. त्यांनी  आम्ही लवकरात लवकर कारवाई करू असे सांगितले. प्रभाग ड येथील क्षेत्रीय अधिकारी उमाकांत  गायकवाड यांच्याशी चर्चा करून हे अतिक्रमण  त्वरित पाडू असे सांगितले. त्यामुळे लवकर कारवाई होईल अशी आशा आहे.

परंतु,  पुनावळे – जांभे रस्ता, जमीन मिळकत क्र. 40/1, 4/2/1/अ व 40/2/2/अ जागेवर ज्यांनी कोणी अतिक्रमण केले आहे. त्यांना कायद्याचा धाक नाही. त्यांनी कायद्याची खिल्ली उडवण्याचे काम केले आहे. महापालिका  प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे अतिक्रमण धारक कायद्याचे उल्लंघन करताना दिसतात. याबाबत जानेवारी महिन्यात तक्रार दिली. पण, महापालिका अधिकाऱ्यांच्या चालढकल भूमिकेमुळे अर्ज चार महिने प्रलंबित राहिला. आता एप्रिल महिन्यात  अर्ज निकाली काढण्यात येत आहे.

Nigdi : खिडकीत अडकलेल्या 6 वर्षाच्या मुलाची अग्निशमन दलाने केली सुखरूप सुटका

महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह साहेब आपण जनतेची सेवा करण्यासाठी बसलेला आहात. गोरगरिबांची घर उध्वस्त करण्यासाठी नाही. गोरगरिबांचे फुलांचे फळांचे स्टॉल उद्ध्वस्त करण्यासाठी तुमचे प्रशासन काम करत आहे का? असा सवाल नाईक यांनी केला.(Punavale) पुनावळे येथील अतिक्रमण लवकरात लवकर पाडावे. सर्वसामान्य नागरिकांना न्याय द्यावा अशी मागणीही त्यांनी केली. बिनधास्तपणे सुरू असलेले अनधिकृत बांधकाम महापालिका अधिकाऱ्यांना दिसत कसे नाही, हा मोठा प्रश्न आहे. अनधिकृत बांधकाम धारक आणि महापालिका अधिकाऱ्यांमध्ये काही साटेलोटे आहे काय?अशी शंका आम्हाला येते, असेही ते म्हणाले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.