Nigdi : घरफोडी करून सोन्याचांदीचे दागिने लंपास

एमपीसी न्यूज – घराचा सेफ्टी दरवाजाचा कोयंडा आणि लॅच लॉक तोडून घरातून 70 हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि घड्याळ असा ऐवज चोरून नेला. ही घटना सोमवारी (दि. 24) पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास निगडी गावठाण येथे उघडकीस आली.

याप्रकरणी 32 वर्षीय महिलेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला तिच्या आई-वडीलांसोबत निगडी गावठाण येथे राहतात. रविवारी पहाटे सहाच्या सुमारास घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घराच्या सेफ्टी दरवाजाचा कोयंडा कट केला. तसेच मुख्य दरवाजाचे लॅचलॉक तोडून घरात प्रवेश केला. घरात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने आणि घड्याळ असा एकूण 70 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला.

फिर्यादीचे आई-वडील सोमवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास घरी आले असता हा प्रकार उघडकीस आला. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक एस वाय होळकर तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.