Nigdi News : प्रतिबंधित गुटखा विक्रेत्यास अटक

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने थरमॅक्स चौक ते दुर्गानगर रस्त्यावर असलेल्या एका पान टपरीवर कारवाई करून टपरी चालकाला अटक केली. टपरी चालक त्याच्या टपरीमधून प्रतिबंधित गुटखा विकत होता. तसेच त्याने त्याच्या घरात गुटखा साठवून ठेवला असल्याने ही कारवाई करण्यात आली.

जावेद मनसुद शेख (वय 35, रा. दुर्गानगर झोपडपट्टी, निगडी) असे अटक केलेल्या टपरी चालकाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस नाईक अमोल साडेकर यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, थरमॅक्स चौक ते दुर्गानगर रस्त्यावर आरोपी जावेद याची जी बी इंटरप्रायजेस नावाने पान टपरी आहे. त्यातून तो गुटखा विक्री करत असून त्याने घरात गुटखा साठवून ठेवला आहे, अशी माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. त्यात जावेद याने टपरीमध्ये आणि घरात गुटखा ठेवल्याचे आढळून आले. त्याच्या ताब्यातून रोख रक्कम आणि गुटखा असा एकूण 48 हजार 275 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक उत्तम ओमासे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.