Nigdi : किराणा दुकान फोडून तांदळाच्या पिशव्या आणि सिगारेटची पाकिटे चोरीला

एमपीसी न्यूज – किराणा दुकानाचे शटर उचकटून दुकानातून तांदळाच्या पिशव्या आणि सिगारेटची पाकिटे चोरून नेली. ही घटना पूर्णानगर चिंचवड येथे शुक्रवारी (दि. 24) रात्री साडेदहा ते शनिवारी (दि. 25) सकाळी साडेसातच्या सुमारास घडली.

भेराराम डुंगाजी चौधरी (वय 54, रा. शिवयोगी अपार्टमेंट, सेक्टर नंबर 18, शिवतेजनगर, चिखली) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौधरी यांचे पूर्णानगर चिंचवड येथे भोसले पेट्रोल पंपाच्या शेजारी भगवती मार्केट नावाचे किराणा दुकान आहे. त्यांनी शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास दुकान बंद केले. रात्री अज्ञात चोरटयांनी दुकानाचे कुलूप तोडून शटर उचकटून आतमध्ये प्रवेश केला. दुकानातील 65 हजार 200 रुपये किमतीच्या तांदळाच्या पिशव्या आणि सिगारेटची पाकिटे, दुकानातील गल्ल्यामधून 40 हजार रुपये रोख रक्कम आणि 1 हजार 200 रुपयांची चिल्लर घेऊन चोर पसार झाले. शनिवारी सकाळी साडेसातच्या सुमारास चौधरी दुकान उघडण्यासाठी आले असता, दुकानाचे शटर उचकटल्याचे समोर आले. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रघुनाथ भोये तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.