Nigdi : देशातील पहिले महिला रिक्षा स्टँड निगडीत होणार

एमपीसी न्यूज – कष्टकरी महिला रिक्षा चालकांना हक्काचे रिक्षा स्टॅन्ड मिळावे, या उद्देशाने, महाराष्ट्र रिक्षा पंचायतीच्या वतीने देशातील पहिले महिला रिक्षा स्टॅन्ड निगडीत उभारले जाणार आहे.

महिलांना रिक्षा चालवण्यासाठी चांगले वातावरण निर्माण व्हावे, त्यांनाही हक्काचे रिक्षा स्टँड मिळावे, यासाठी महाराष्ट्र रिक्षा पंचायतच्या वतीने निगडी येथे देशातील पहिले महिला रिक्षा स्टॅन्ड उभारले जाणार आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे नावे या स्टॅन्ड चे उद्धघाटन भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार महेशदादा लांडगे यांच्या हस्ते ६ फेब्रुवारी रोजी भक्ती शक्ती चौक निगडी येथे पार पडणार आहे.

महिलाही पुरुषांच्या बरोबरीने सन्मानाने रिक्षाचालक झाल्या असून, आता महिलाही रिक्षा चालवणार आहेत.महाराष्ट्र रिक्षा पंचायती च्या प्रयत्नातुन पिंपरी चिंचवड मधील शहरातील शंभरपेक्षा अधिक महिलांना रिक्षा लायसन्स, बॅच, परमिट आणि नवीन रिक्षा मिळाल्या असल्याची माहिती महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे संस्थापक व अध्यक्ष बाबा कांबळे यांनी दिली

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.