Noise pollution in ganpati : यंदा गणेश विसर्जन मिरवणुकीने ओलांडली दुपटीने ध्वनी प्रदूषणाची पातळी

एमपीसी न्यूज : दोन वर्षानंतर गणेश विसर्जनाची मिरवणूक अगदी जोमात पार पडली. या अति उत्साहामुळे यंदा ध्वनीप्रदुषण पातळी 105.2 डेसिबल म्हणजे आवाज मर्यादेच्या दुपटीपेक्षा जास्त होता.(Noise pollution in ganpati) त्यामुळे लक्ष्मी रस्त्यावर राहणाऱ्या नागरिकांनी तो आवाज असह्य असल्याचे मत नोंदविल्याचा निष्कर्ष सीआईपी महाविद्यालयाने केलेल्या सर्वेक्षणामध्ये समोर आले आहे.

ही मोजणी लक्ष्मी रस्त्यावरील 24 तासातील 10 चौकाच्या पातळीवरून आढावा घेतला गेला. बेलबाग चौक, गणपती चौक, लिंबराज चौक, कुमठेकर चौक, उंबऱ्या चौक, गोखले चौक, शेडगे चौक,होळकर चौक, टिळक चौक, खंडोजी बाबा चौक या चौकांचा समावेश होता. या मध्ये सरासरी 95.1 डेसीबल आवाजाची शुक्रवारी (दि.9) पातळी नोंदविण्यात आली. या सर्वेक्षणामध्ये यंदा सर्वात कमी ध्वनी पातळी सायंकाळी चार वाजता खंडूजी बाबा चौक येथे 64 डेसीबल एवढी नोंद करण्यात आली तर सर्वाधिक नोंद सकाळी आठ नंतर खंडूजी बाबा चौक येथेच 128.5 डेसिबल जी अति धोकादायक पातळी म्हणून नोंदवली गेली.

Tree plantation : स्वा. सु.सद्गुरू जोग महाराज 153 व्या जन्मोत्सवानिमित्त 153 झाडांचे वृक्षारोपण

गणेश विसर्जन मिरवणूकीत होणाऱ्या ध्वनीप्रदुषणाची पातळी मोजण्याचे काम सीओईपी मागील 22 वर्षापासून करत आहे.अभ्यास व जनजागृतीच्या हेतूने हा उपक्रम राबविला जातो.(Noise pollution in ganpati) या सर्वेक्षणाची चांगली बाजू बघायची झाली तर गेल्या काही वर्षात मंडळे व त्यांचे कार्यकर्ते हे होणाऱ्या ध्वनीप्रदुषणाबाबत जागृक झाले आहेत. मंडळांनीही होणाऱ्या ध्वनीप्रदुषणाची पातळी मोडण्याबाबत उत्सुकता दाखवली तसेच यावेळी पोलीस व स्वतः कार्यकरत्यांनीही या उपक्रमात सीओईपी च्या पथकाला सहकार्य केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.